दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. नाणार प्रकल्पस्थळ निश्चितीबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा सुरू असून, सहमतीनंतर निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडून देण्यात आली आहे.
यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी राऊतांची भेट घेऊन हा प्रकल्प विदर्भात आणला तर आम्ही त्याचे स्वागत करू असे म्हटले असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.