मुंबई : प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे दिग्दर्शन असलेला शेर शिवराज हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकंतच या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. दिग्पाल लांजेकर यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी ‘शेर शिवराज’ या चित्रपटाचे पहिले गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. या पोस्टसोबत त्यांनी ते गाणेही शेअर केले आहे. ‘यळकोट देवाचा’ असे या गाण्याचे नाव आहे.
हे गाणे दिग्पाल लांजेकर यांनी स्वत: लिहिलेले आहे. तर हे गाणे आदर्श शिंदे आणि जुईली जोगळेकर यांनी गायले आहे. या गाण्यात चिन्मय मांडलेकर, मृण्मयी देशपांडे, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, विक्रम गायकवाड, सचिन देशपांडे यांसारखे अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहे.
‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :


