मुंबई : यंदाची आयपीएल स्पर्धा २६ मार्चपासून सुरू झाली आहे. गेल्या हंगामाप्रमाणे या लीगला करोनाचा फटका बसलेला नाही, त्यामुळे यावेळी बीसीसीआय केवळ दोन शहरांच्या चार स्टेडियममध्ये ही स्पर्धा आयोजित करत आहे. यापैकी तीन ठिकाणे मुंबईत आणि एक पुण्यात आहे. यावेळी, आयपीएलच्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर, २५ टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लवकरच स्टेडियममधील प्रेक्षकांची संख्या आणखी वाढू शकते. कारण देशातील करोनाबाबतची परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे. एका दिवसापूर्वी देशात कोरोनाचे १२५९ नवीन रुग्ण आढळले होते. तर ३५ जणांचा मृत्यू झाला. जे प्रमाण कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय लवकरच आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये ७० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देऊ शकते. लवकरच भारतीय क्रिकेट बोर्डाकडून या संदर्भात औपचारिक घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे सर्व सामन्यांच्या तिकिटांचे बुकिंगही सुरू झालेले नाही.
असे झाले तर चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असेल. कारण गेल्या दोन सत्रांपासून चाहत्यांना स्टेडियममध्ये बसून आयपीएलचा आनंद लुटता आलेला नाही. २०२०मध्ये, संपूर्ण आयपीएल यूएईमध्ये झाली. तर गेल्या वर्षी पहिला टप्पा भारतात झाला होता.
महत्त्त्वाच्या बातम्या –
- भाजप खासदाराचा नवीन लुक बघून उप राष्ट्रपतीही पडले गोंधळात; म्हणाले,”ही दाढी आहे की मास्क?”
- IPL 2022 : आज RCB आणि KKR आमनेसामने; वाचा कधी, कुठे पाहता येणार सामना!
- IPL 2022 : मोहम्मद शमीची भन्नाट बॉलिंग बघून अमेरिकेची ‘ही’ पॉर्नस्टार झाली फिदा!
- Women’s World Cup 2022 : भारीच ना..! विंडीजला धूळ चारत ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये धडक
- आपली लग्झरी कार सोडून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं केला ट्रेनमधून प्रवास,पहा कोण आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

