Share

घरकुल योजनेचा डीपीआर केंद्र सरकारने रोखला! हे आहे कारण…

Published On: 

औरंगाबादः  पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी 31 मार्च ही अंतिम मुदत दिलेली असताना देखील औरंगाबादमधील घरकुलांचा प्रस्ताव रोखून धरण्यात आलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिका आणि राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे ही योजना रखडली होती. घरकुल बांधण्यासाठी औरंगाबादमध्ये जमीनच उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. अखेर फेब्रुवारी महिन्यात ही जमीन उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतरच्या तीन आठवड्यात महापालिकेने युद्ध पातळीवर काम करून घरकुल योजनेचा डीपीआर तयार केला.

आता 31 मार्च ही योजनेची अखेरची मुदत आहे. तत्पूर्वी डीपीआरला मंजुरी मिळाली तरच औरंगाबादमधील गरीबांना घरं मिळू शकतील. मात्र केंद्र सरकारने विलंब झाल्याचे कारण दाखवत या योजनेला अद्याप मंजुरी दिलेली नाही.

घरकुल योजनेचा घटनाक्रम –

  • केंद्र सरकारने 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्यासाठी 2016 मध्ये पंतप्रधान आवास योजना सुरु केली. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेने बेघर आणि गरजू नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले.
  • महापालिकेकडे 82 हजार अर्ज आले आहेत. त्यातील 52 हजार अर्ज पात्र ठरले.
  • मागील सात वर्षांमध्ये महापालिकेला योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जागाच मिळाली नव्हती. खासदार इम्तियाज जलील यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडला.
  • संसदेच्या स्थायी समितीने त्याची दखल घेत संबंधित वरिष्ठ अदिकाऱ्यांना दिल्लीला बोलावले.
  • त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आधी 19 हेक्टर आणि नंतर 86 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली. त्यानंतर महापालिकेने तीन आठवड्यातच प्रकल्प सल्लागार संस्था अर्थात पीएमसी नियुक्तीची निविदा काढली.
  • पीएमसी मार्फत घरकुल बांधण्यासाठी डीपीआर तयार करण्याकरिता एजन्सी नियुक्त केली. या एजन्सीने डीपीआर तयार केला. महापालिकेने तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी 15 मार्च रोजी पाठवण्यात आला आहे. 39,760 घरांच्या योजनेचा हा प्रस्ताव आहे. मात्र विलंब झाल्याचे तांत्रिक कारण दाखवत केंद्र सरकारने अजूनही मंजुरी दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या –

“उंबरातले किडेमकोडे उंबरी करिती लीला…”- भातखळकरांचा शरद पवारांना टोला

“…तो तरुण एक दिवस राजकारणात नक्कीच यशस्वी होईल”- शरद पवार

IPL 2022: ‘भाऊ..आयपीएलमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे’; विरुने केले हैदराबादला ट्रोल

“IPL 2022 सोडलं म्हणून तस्कीन अहमदला बक्षीस द्या”, मशरफी मुर्तझाची मागणी!

कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारात होणार वाढ!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!