Share

‘जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा; इतरांनी त्यात नाक खुपसू नये’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु शेजारील देश पाकिस्तानला मात्र या निर्णयामुळे झटका बसला होता. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाला काश्मीरच्या मुद्द्यावर पत्र लिहिलं होतं त्यावरून राहुल गांधींनी पाकिस्तानला फटकारले आहे.

याविषयी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले आहे यामध्ये त्यांनी ‘माझे भाजप सरकारसोबत अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, हे मी स्पष्ट करतो. यामध्ये पाकिस्तान किंवा इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात पाकिस्तानसह चीन आणि अमेरिकेलाही इशारा देईल आहे.

तसेच पुढे त्यांनी ‘जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा झाली आहे. कारण जम्मू काश्मीरमधील नागरिकांना भडकवलं जात असून पाकिस्तानचा या सर्वाला पाठिंबा मिळत आहे. या पाकिस्तानची जगभरात दहशतवादाचा मुख्य समर्थक अशी ओळख आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या भूमिकेमुळे एकसंघ भारताची कल्पना येते. भाजप आणि कॉंग्रेस जरी राजकीय विरोधक असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोधकांचा सामना करण्यासाठी जी एकी हवी असते ती राहुल गांधी यांच्या ट्वीटमध्ये दिसून येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!