टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे.
या यात्रेतील पंढरपूर येथील सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे म्हणाले होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर सत्तेला लाथ मारू. पण हे जसा गुळाला मुंगळा चिकटून बसतो तसे ते बसले आहेत. यांच्या खिशातील राजीनामे भिजून गेलेत पण त्यांनी राजीनामे काही दिले नाहीत’ अशी टीका शिवसेनेवर केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी भाजपवरही टीका केली आहे. त्यांनी ‘महाराष्ट्रातील माता भगिनींनी आशीर्वाद दिला तर रंकाचा राव होतो, परंतु त्यांनी शाप दिला तर रावाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवा! तसेच ‘पुन्हा मलाच मुख्यमंत्री करा हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा आहे. ज्यांनी महापुरुषांच्या फोटोत भ्रष्टाचार केला त्यांनी आम्हाला भगवा कसा पेलायचं हे सांगू नका’ अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘हा भगवा माथी भडकवण्यासाठी नाही तर रक्षण करण्यासाठी आहे हे सांगण्यासाठीच आम्ही भगवा हाती घेतला आहे’ असंही विधान कोल्हे यांनी केले आहे. दरम्यान या सभेला महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, सरचिटणीस अमोल मिटकरी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
- ‘मुख्यमंत्री पोलिसांचं कडंं घेऊन फिरतात, आपल्या यात्रेत मात्र महाराष्ट्राचा मावळा सामील आहे’
- मुख्यमंत्री बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास का घाबरतात ? : जयंत पाटील
- युतीची घोषणा कधी ही होवू शकते, मुख्यमंत्र्याचे सूचक वक्तव्य
- राम शिंदेंचा पराभव होणार, मग त्यांना मंत्री कसं बनवणार ? – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

