टीम महाराष्ट्र देशा : आठ – नऊ वर्षांपासून आपण बार्शी तालुक्यात शिवसेना वाढवण्याचे काम केले आहे. पक्षवढीसाठी आ दिलीप सोपल यांना पक्षप्रमुखांनी प्रेवश दिला याचं मी स्वागत करतो. परंतु शिवसेनेच्या उमेदवारीवर पहिला आपला हक्क असल्याचं सांगत शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दंड थोपटले आहेत.
बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेस आ दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. 28 ऑगस्टला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर सोपलांचा प्रवेश होणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तालुक्यातील सहकाऱ्यांच्या मागणीमुळे आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सोपल यांनी सांगितले.
एका बाजूला शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये पोलीस दलातून निवृत्ती घेतल्यानंतर भाऊसाहेब आंधळकर यांनी पक्षाला ताकद देण्याचं काम केलं. आता दिलीप सोपल यांच्या प्रवेशामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आपण घरदार विसरून सर्व शक्तीपणाला लावून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. सोपल यांनी पुढील पाच वर्षे शिवसेनेत काम करावं, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारी पहिला आपला हक्क आहे. पक्षप्रमुख योग्य निर्णय घेतील, असं आंधळकर यांनी म्हणाले आहेत.
दुसरीकडे सध्या भाजपमध्ये असणारे राजेंद्र राऊत यांनी देखील काहीही झालं तरी आपण सोपल यांना पराभूत करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यामध्ये युती झाली तरी आपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वास आहे, ते नक्की न्याय करतील असंही राऊत म्हणाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

