टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरे आहे. यासाठी सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. यात भाजपच्या महाजनादेश यात्रेचाही समावेश आहे.
याच यात्रेतील एका सभा बीडमध्ये पार पडली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मोठ विधान केले आहे. त्यांनी माझ्या जेव्हा मुलाखती घेतल्या जातात तेव्हा तुमचा गुरु कोण असं मला विचारलं जातं. अशावेळी साहजिकपणे माझे वडील माझे गुरु असल्याचं मी सांगते. पण आज ते नाही आहेत. त्यांच्या पश्चात जर कुणी असेल तर मी सांगते देवेंद्र फडणवीस माझे गुरु आहेत असं विधान केले आहे.
इतकेच नव्हे तर ‘द्रोणाचार्याला अर्जून हा त्याचा प्रिय शिष्य होता. त्याच्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये यासाठी त्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला. गुरुसाठी अंगठा कापून देण्याच्या परंपरेचे आपण आहोत. मात्र तो अंगठा अर्जुनासाठी होता. तुमच्यासाठी मी एकलव्य होऊन अंगठा द्यायला तयार आहे. पण फक्त तो अर्जुनासाठी असावा दुसऱ्यांसाठी नाही असंही विधान त्यांनी केले आहे.
दरम्यान, महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून घरत आहे. या निमित्त सध्या ते बीड जिल्ह्यात आहेत.
- ‘या सरकारने महाराजांच्या नावाखाली कर्जमाफीची घोषणा केली आणि शेतकऱ्यांना फसवले’
- महादेव जानकरांचा घुमजाव; संजय दत्त ‘रासप’साठी निभावणार ‘ही’ भूमिका
- सत्ता असताना काही केलं नाही, आता कसल्या यात्रा काढता ?
- भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान, म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

