Share

‘साहेब कुठे आहेत ते मला माहिती नाही’; नेटीझन्सच्या प्रश्नांना करुणा मुंडेंची बिनधास्त उत्तरं

Published On: 

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी नुकताच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली रोखठोक मते मांडली यामुळे सध्या या फेसबुक लाईव्हची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

कोरोनाकाळात जनता कोणत्या समस्यांचा सामना करत आहे इथपासून ते लोकप्रतिनिधींचे या काळात आचरण कसे असावे याबाबत त्यांनी भाष्य केले.यावेळी त्यांनी आमदार निवासावर होणाऱ्या भरमसाठ खर्चावर देखील त्यांनी भाष्य केले. मी सरकारला विनंती करते की, पोलिसांच्या वस्त्या नवीन बनवा, दुरुस्त करा. जी इमारत आमदार निवासासाठी उभारली जात आहे त्यावर एवढे पैसे खर्च करण्याची गरज काय गरज आहे? हा पैसा सामान्यांसाठी वापरा असे आवाहन त्यांनी केले आहे.

करुणा मुंडे यांनी या सोबतच त्यांनी नेटीझन्सच्या प्रश्नांना देखील करुणा मुंडे यांनी बिनधास्त उत्तरं दिली. यावेळी एका नेटकऱ्याने साहेब कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना त्यांनी हसून साहेब कुठे आहे ते मला नाही माहित अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली.

यावेळी संवाद साधताना करुणा मुंडे यांनी एका आणखी कमेंटला उत्तर देताना एक मोठा खुलासा देखील केला आहे. करुणा मुंडे यांच्याकडे त्यांचे पती धनंजय मुंडे हे नेहमी त्यांना मराठी शिकून घेण्याबाबत आग्रह धरत असत असा दावा त्यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या,मी १०० टक्के मराठी शिकणार आहे. मला मराठी समजते, बोलता देखील येते मात्र म्हणावी तितक्या सफाईदारपणे येत नाही म्हणून मी मराठी बोलत नाही. माझे पती नेहमी याबाबत माझ्याकडे आग्रह धरायचे. ते माझ्याशी १०० टक्के मराठीतच बोलायचे मात्र मी त्यांच्याशी हिंदी आणि इंग्रजीत बोलत होते. मी जेव्हा तुम्हा लोकांच्या समवेत परळीत राहायला आल्यानंतर मला मराठी बोलायला शिकवा अशी विनंती देखील त्यांनी परळीतील जनतेला केली आहे.दरम्यान, करुणा या लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!