मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी नुकताच फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली रोखठोक मते मांडली यामुळे सध्या या फेसबुक लाईव्हची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
यावेळी संवाद साधताना करुणा मुंडे यांनी एका कमेंटला उत्तर देताना एक मोठा खुलासा देखील केला आहे. करुणा मुंडे यांच्याकडे त्यांचे पती धनंजय मुंडे हे नेहमी त्यांना मराठी शिकून घेण्याबाबत आग्रह धरत असत असा दावा त्यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या,मी १०० टक्के मराठी शिकणार आहे. मला मराठी समजते, बोलता देखील येते मात्र म्हणावी तितक्या सफाईदारपणे येत नाही म्हणून मी मराठी बोलत नाही. माझे पती नेहमी याबाबत माझ्याकडे आग्रह धरायचे. ते माझ्याशी १०० टक्के मराठीतच बोलायचे मात्र मी त्यांच्याशी हिंदी आणि इंग्रजीत बोलत होते. मी जेव्हा तुम्हा लोकांच्या समवेत परळीत राहायला आल्यानंतर मला मराठी बोलायला शिकवा अशी विनंती देखील त्यांनी परळीतील जनतेला केली आहे.
दरम्यान, तत्पूर्वी बोलताना त्यांनी आपली परळीला जाण्याची इच्छा असल्याचे देखील सांगितले. लवकरच आपण परळीमध्ये जाऊ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.या कोरोनाच्या भीषण संकटात त्याठिकाणी जाऊन जनतेची सेवा करावी अशी इच्छा असल्याचा मानस देखील त्यांनी यापूर्वीच बोलून दाखविला आहे.
दरम्यान,करुणा यांनी आपल्या फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांच्या अनेक समस्यांवर भाष्य केले आहे. कोरोनामुळे सध्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून मुख्यमंत्र्यांनी यातून लोकांना बाहेर काढावे अशी विनंती त्यांनी केली आहे.करुणा या लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- खतांच्या वाढत्या किंमती विरोधात बच्चू कडू आक्रमक, ताली थाली बजाव आंदोलन करणार
- दिलासादायक : करोना विषाणू 99.99 टक्के नष्ट करणारी थेरेपी विकसीत करण्यात वैज्ञानिकांना आले यश
- ‘गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करणारे पंतप्रधान महाराष्ट्राचा दौरा का करत नाहीत?’
- ‘आघाडी सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक; आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का?’
- कोरोनावर रेमडेसीवीर प्रभावी नाही, उपचारपद्धतीतून हटविण्याचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

