Share

…म्हणून मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करणार ; भाजप आक्रमक

Published On: 

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुऴे मुंबईचे मोठं नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडले आहेत. घराचं नुकसान झालं आहे. शिवाय इथल्या रस्त्यांचेही नुकसान झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडली होती. अनेक ठिकाणी यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

चक्रीवादळामुळे मुंबई शहरात 2 हजार 364 वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. वादळानंतर 48 तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आलेल्या नाहीत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. गेल्या 3 महिन्यापासून वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समिती समोर 18 मार्च 2021 पासून आजतागायत प्रलंबित आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल भाजपनं केलाय. येत्या आठवडाभरात वृक्ष प्राधिकरणामध्ये वृक्ष छाटणीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन प्रत्यक्ष वृक्ष छाटणीस प्रारंभ केला नाही तर मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल, असा इशारा भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत दिला.

दरम्यान चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दिवला भेट देऊन तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे. भावनगर, उना, दिव,जाफराबाद आणि महूआ या भागाची हवाई पाहणी देखील पंतप्रधान करणार असून अहमदाबाद इथं आढावा बैठक घेणार आहेत. तर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील कोकणाचा २ दिवसीय दौरा करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!