Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार !

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. या वादळानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.

माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते नुकसानग्रस्त भागांना भेट देत आहेत. गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर राज्य सरकारने अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली होती. ती मदत देखील बाधितांना मिळाली नाही, असं म्हणत यंदा राज्य सरकारने कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असा सल्ला देखील दिला आहे.

दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरा निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी चक्रीवादळग्रस्त सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा पाहणी दौरा करणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचं समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!