कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पक्षीय राजकारण बाजूला सारून मराठा समाजासोबत मैदानात उतरण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपच्या आक्रमकतेमुळे राज्य सरकारच्या डोकेदुखीत आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. ‘हक्क मागतोय, भीक नाही !’ अशी गर्जना करत आता राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज व भाजप नेते समरजित घाटगे यांनी राज्य सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.
‘मराठा समाज आपला हक्क मागत आहे, भीक नाही. त्यामुळे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. मराठा समाजाने आता सरकारच्या मानेवर बसून आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज राहावे,’ असं आवाहन घाटगे यांनी मराठा समाजाला केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत काल मुंबईत भाजपची बैठक पार पडली. यानंतर आज समरजित घाटगे यांनी आपली भूमिका माध्यमांशी बोलताना जाहीर केली आहे.
यासोबतच, ‘पश्चिम महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा आणि भेटीगाठी घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या आंदोलनाला फूस लावण्याचा प्रयत्न भाजपने कधीही केलेला नाही, तसं असतं तर वर्षभरापूर्वीच आंदोलनं झाली असती,’ असं भाष्य करत घाटगे यांनी भाजपवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नितीन गडकरी यांचा सल्ला त्यांचे बॉस ऐकतायत का? ; काँग्रेसचा सवाल
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- ‘राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार’- अमित देशमुख
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार !
- ‘चंद्रकांतदादा, मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, मग समजेल जनतेच्या मनात काय आहे’


