Share

नितीन गडकरी यांचा सल्ला त्यांचे बॉस ऐकतायत का? ; काँग्रेसचा सवाल

Published On: 

मुंबई : ‘जर मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर समस्या निर्माण होते. एका कंपनीऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना तसंच रॉयल्टी द्या. तसेच लसनिर्मिती वाढवण्यासाठी फॉर्म्युला देशभरातील इतर प्रयोगशाळांसोबत शेअर केला पाहिजे. माझी खात्री आहे की, प्रत्येक राज्यात किमान एक ते दोन अशा प्रयोगशाळा असतील ज्यांच्याकडे क्षमता आणि पायाभूत सुविधा असतील. त्यांच्यासोबत फॉर्म्युला शेअर करा आणि लसनिर्मिती वाढवण्यासाठी समन्वय साधा. यानंतर ते देशात पुरवठा करतील. निर्मिती जास्त असेल तर ते निर्यातही करू शकतील. हे १० ते १५ दिवसांत केले जाऊ शकते,’ असा सल्ला मोदी सरकारमधील रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

मात्र, यावरून आता काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकावर टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक ट्वीट करून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. ते त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले कि, ‘नितीन गडकरी यांनी जो सल्ला दिला आहे ते मनमोहन सिंग यांनी १८ एप्रिलला सुचवले होते. पण त्यांचे बॉस ऐकतायत का?’ असा सवाल त्यांनी त्यांच्या ट्वीटमधून विचारला आहे.

दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!