मुंबई : कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दरम्यान कार्तिकने त्याच्या संबंधी एक बातमी सोशल मिडीयावर शेअर केली आहे. त्याला पुन्हा एकदा कोरोना झाल्याची बातमी कार्तिकने सोशल मिडियावरून शेअर केली आहे. त्याने स्वतचा एक फोटो शेअर करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.
कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवरून फोटो शेअर केला आहे. ‘भूल भुलैया २’ चित्रपटाकडे लक्ष वेधत कॅप्शन मध्ये लिहिले की, सर्व काही खुप पॉझिटिव्ह होत होते त्यामुळे कोरोनालाही रहावले नाही आणि सोबत एक ईमोजी शेअर केला आहे. या पोस्टवर कमेंट करत युजर्स त्याला काळजी घ्यायला सांगत आहेत.
https://www.instagram.com/p/CeYQXUWtN42/?igshid=YmMyMTA2M2Y=
कार्तिकला कोरोना लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे याआधी देखील त्याला कोरोनाची लागण झाली होती. याआधी त्याला २२ मार्च २०२२ रोजी कोरोना झाला होता. कार्तीकवर ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाच्या यशामुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या चित्रपटाने २ आठवड्यांमध्ये १३७ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. कार्तिक आर्यन या चित्रपटासंदर्भात सतत सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत असतो.
महत्वाच्या बातम्या :


