मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर कधी काय घडेल हे सांगणे कठीण आहे. सामन्यादरम्यान कोणत्या प्रकारचे विक्रम घडू शकतात आणि तसे आजपर्यंत अनेक वेळा घडले आहे. काही संघ अभिमानास्पद नवीन विक्रमाला गवसणी घालण्यात यश मिळतात. तर कित्येकदा संघांच्या अपयशाचेही लाजिरवाणे विक्रम पाहायला मिळतात. आता आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक आशिया क्वालीफायर स्पर्धेत सामना नेपाळ अंडर-१९ आणि युएइ अंडर-१९ संघाशी झाला. या सामन्यात नेपाळचा संघ यूएईने अवघ्या ८ धावांत सर्वबाद झाला.
नेपाळविरुद्ध यूएईची वेगवान गोलंदाज माहिका गौरने अप्रतिम गोलंदाजी करताना केवळ दोन धावा देत नेपाळच्या संघाच्या ५ फलंदाजांना बाद केले. तर इंदुजा नंदकुमारने ६ धावांत ३ बळी घेतले. या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळ संघाचा हा निर्णय योग्य ठरला नाही आणि यूएईच्या गोलंदाजीसमोर या संघाचे फलंदाज पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. नेपाळकडून सहा फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. नेपाळचा संघ ८.१ षटकात सर्वबाद झाला आणि त्यानंतर युएइ संघाने विजयासाठी दिलेले ९ धावांचे लक्ष्य अवघ्या ७ चेंडूत पूर्ण करत सामना जिंकला.
#NEPvsUAE
– United Arab Emirates Under-19s Women won by 10 wickets#iccu19womenst20worldcup #asiaqualifier2022 pic.twitter.com/Dtbcwc49t3— CAN (@CricketNep) June 4, 2022
टी-२० विश्वचषक आशिया क्वालीफायर स्पर्धा भूतान, नेपाळ, थायलंड, कतार आणि युएइ यांच्यात खेळवली जात आहे. यातील विजयी संघ जानेवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या पहिल्या आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकात आपले स्थान निश्चित करेल. नेपाळने शुक्रवारी त्यांचा पहिला सामना जिंकला जेथे त्यांनी कतारला ३८ धावांवर सर्वबाद करत ७९ धावांनी विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या:


