मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘थलायवी’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. कंगनाचा थलायवी चित्रपट रिलीज येत्या 10 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यासाठी काही दिवसापूर्वीच कंगनाने तिच्या थलायवी टीमसह अम्मांचे आशीर्वाद घेण्यासाठी चेन्नईतील दिवंगत जयललिता स्मारकाला भेट दिली होती.
सध्या कंगना थलायवीच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त असल्याचे दिसत आहे. ती चित्रपटाच्या प्रमोशनकडे अधिक भर देताना दिसत आहे. सोशल मिडियावर सक्रिय असलेल्या कंगनाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील स्वत:चे नाव देखील बदलेले आहे. आता तिने तिचे नाव कंगना राणौतच्या जागी ‘कंगना थलायवी’ लिहिले आहे. यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

हा चित्रपट जयललिता यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरसचे संकट असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होण्याचाही तारीख पुढे ढकलली गेली. हा चित्रपट एकाच वेळी वेगवेगळ्या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी एम.जी.रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हिंदी, तेलुगु आणि तमिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
https://www.instagram.com/p/CTFANXQi49T/?utm_source=ig_web_copy_link
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अंबानीला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा तळतळाट लागणार हे नक्की’
- उदाहरण कसले द्यायचे हे नाना पटोले यांना समजतं का?, मनसेचा संतप्त सवाल
- राणे आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने ! ‘मुख्यमंत्र्यांशिवाय चिपी विमानतळाचे उद्घाटन शक्य’
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- केंद्राने महाराष्ट्राला दिलेला इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे – राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

