Share

ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक

Published On: 

रायपुर – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच महागात पडले आहे. नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात नंदकुमार बघेल यांना पोलिसांनी अटक केली आहे.

रायपूर पोलिसांनी नंदकुमार बघेल यांना अटक केली असून कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अलीकडेच नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांना ‘उपरे’ (बाहेरचे) म्हटलं होतं. ब्राह्मण हे परकीय असल्याचे सांगून त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन लोकांना केले, तसेच ब्राह्मणांना आपल्या खेडय़ात प्रवेश करू देऊ नका असेही सांगितले. बघेल यांच्या वक्तव्यावर ब्राह्मण समुदायानं आक्षेप घेत रायपूरच्या डीडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.धर्म, वंश इ. आधारावर वेगवेगळ्या समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे यांसह इतर आरोपांखाली भादंविच्या विविध कलमांखाली या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

दरम्यान वडिलांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर, अशा शेरेबाजीमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. आपल्या राजवटीत कुणीही कायद्यापेक्षा मोठा नसून, या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील असे ते म्हणाले. “कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही, जरी ती व्यक्ती माझे ८६ वर्षीय वडील असले तरी…छत्तीसगड सरकार सर्व धर्म, प्रांत, समाज आणि त्यांच्या भावनांचा आदर करतं. माझ्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे सांप्रदायिक शांतता भंग झाली आहे. मलादेखील त्यांच्या वक्तव्यामुळे वाईट वाटत आहे,” असं भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी भगवान श्रीरामाविरुद्ध कथितरीत्या अपमानास्पद शेरेबाजी केली होती, असे तक्रारीत म्हटल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले होते. उत्तर प्रदेशात एका कार्यक्रमात भाषण करताना नंदकुमार बघेल यांनी ही शेरेबाजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!