औरंगाबाद : भारतीय जनता पक्षावर टीका करताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी थेट रामायनाचा संदर्भ घेतला होता. राज कुंद्रा प्रकरणात उदाहरण देताना त्यांनी रामायनातील व्हिडीओचे उदाहरण दिले आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी पटोले यांच्यावर टीका केलीय. उदाहरण कसले द्यायचे हे नाना पटोले यांना समजते का? सा संतप्त सवाल खांबेकर यांनी विचारला आहे.
या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून खांबेकर यांनी पटोले यांना लक्ष केले आहे. ते म्हणाले की, ‘उदाहरण कसले द्यायचे हे नाना पटोले ह्यांना समजतं का? तोंडाला येईल ते बोलायचं, टीका बिनदास्त करा पण रामायनचा संदर्भ कश्यासाठी…!’
उदाहरण कसले दयायचे हे नाना पटोले ह्यांना समजतं का? तोंडाला येईल ते बोलायचं, टीका बिनदास्त करा पण रामायनचा संदर्भ कश्यासाठी…!@bbcnewsmarathi @NANA_PATOLE pic.twitter.com/pqIc6KlMh4
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) September 7, 2021
अश्लिल व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्रा सध्या अटकेमध्ये आहे. मात्र, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना राज कुंद्राचा संदर्भ देताना चक्क रामायणाचा उल्लेख केला. यावरुन त्यांच्यावर भाजप नेते टीका करत आहेत. त्यात आता मनसेच्या वतीनेही नाना पटोले यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फक्त मंदीरेच कोरोना पसरवतात असं वाटत का ? भाजपचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
- नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार; विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे खुले, चव्हाणांची महत्वाची सूचना
- कपाटातून चोरीला गेलेले ७ कोटी कुठून आले होते? हेही पवारांनी गवळींना विचारावं – सोमय्या
- ‘त्या’ काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना शिवसेनेला लाज वाटली नाही का?
- ‘गर्दीचा नियम फक्त विरोधकांना नव्हे, सत्ताधाऱ्यांनाही लागू करा’, आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना टोला


