Share

‘अंबानीला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा तळतळाट लागणार हे नक्की’

Published On: 

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सध्या आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. राजू शेट्टी यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, यासाठी काढलेल्या पाच दिवसांच्या पंचगंगा परिक्रमा पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे पहायला मिळाले आहे.

दरम्यान आता शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मुद्यावरून त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर निशाना साधला आहे. राजू शेट्टी यांनी ट्वीट करुण म्हंटले आहे कि, ‘गेल्या दिड वर्षापासून मराठवाडा व विदर्भातील लाखो शेतकरी पिकविमा रक्कमेपासून वंचित आहेत. रिलायन्स कंपनीमध्ये शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे पिकविम्याचा हप्ता भरूनही विमा रक्कम न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

आज पुणे येथील रिलायन्स जनरल इन्शुरन्स च्या कार्यालयात जाऊन सदरची पिकविमा रक्कम तातडीने मिळण्यासंदर्भात सुचना दिल्या. या पध्दतीनेच शेतकऱ्यांना लुबाडून हजारो कोटीचा नफा मिळवून अंबानी जगातील १ नंबरचे श्रीमंत होतील, स्वत:च्या मुलीच्या लग्नात शेकडो कोटींचा चुराडा करून दुसऱ्याचे संसार उघड्यावर पाडणाऱ्या अंबानीना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा तळतळाट लागणार हे नक्की’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!