दिल्ली : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कोकणातील बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा करण्यासह विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही, असं सांगतानाच नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेतच, असं नारायण राणे यांनी म्हटलं. त्यामुळे चिपी विमानतळावरून राणे विरुद्ध शिवसेना असा श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.
येत्या 9 ऑक्टोबर रोजी 12.30 वाजता चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. त्यावेळी मी उपस्थित राहणार आहे. मी आणि ज्योतिरादित्य शिंदे विमानाने मुंबईत येऊ. तिथून सिंधुदुर्गाला जाणार आहोत. सात वर्ष हे विमानतळ बांधून तयार होतं. वाहतुकीला उपलब्ध नव्हतं. मी ज्योतिरादित्य शिंदेना आज सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळाच्या उद्घाटनाची वेळ घेतली, असं नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होईल अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच ५ सप्टेंबरला दिली होती. आता, त्यात २ दिवस वाढवून ९ ऑक्टोबर रोजी राणेंच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटनामुळे शिवसेनेवर त्यांनी कुरघोडी केल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
विनायक राऊत काय म्हणाले होते ?
चिपी विमानतळ सुरू करण्यास अखेर डीजीसीआयची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास अवघ्या 2500 रुपयात होणार आहे. कार्यवाही वेळेत पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच मी पुन्हा एकदा दिल्लीला गेलो होतो. आम्ही हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलो. त्यांना चिपी विमानतळाचे काम पूर्णपणे झालेले आहे. लायसन्स मिळालेलं आहे असं सांगितल्याचं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण करणार; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराडांचे आश्वासन!
- उदाहरण कसले द्यायचे हे नाना पटोले यांना समजतं का?, मनसेचा संतप्त सवाल
- …मग आरएसएसचा ‘सरसंघचालक’ हा मुस्लिमांचा बनवणार का?; संभाजी ब्रिगेडचा सवाल
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- केंद्राने महाराष्ट्राला दिलेला इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे – राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

