🕒 1 min read
मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात कलगितुरा रंगल्याचे पाहायला मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवशेनाला हजर राहू शकले नाही यावरुन विरोधकांनी केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले. अधिवेशनाच्या 2 दिवस अगोदर मुख्यमंत्री विधानभवनामध्ये येऊन गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे. किंवा चर्चा करणे हे विकृत आणि बालिशपणाचं लक्षण आहे. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का? आपली ती संस्कृती आहे का?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी केलेला हा प्रश्न चंद्रकांत पाटलांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून आले. त्यावर चंद्रकांत पाटलांनीही लगेच त्यांना उत्तर दिले आहे. ‘आव्हाड माझा बाप काढतात ती आव्हाडांची संस्कृती आहे. माझी नाही. त्यांना कदाचित उद्धव ठाकरे त्यांचा बाप वाटत असतील. उद्धवजींच्या जवळ जावून एखादी फाईल क्लीअर करायची असेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यावरुन आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केले आहे.
विधानभवनच्या बाहेर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपणा सर्वांकडे मी काल जे काही बोललो त्याची व्हिडीओ क्लीप आहे. त्यामध्ये मी कुठेही चंद्रकांत पाटलांचा च देखील काढला नाही. जर मी त्यांचे नाव घेतल्याचा व्हिडीओ सापडला तर चंद्रकांत पाटलांनी तो मला दाखवावा. मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागायला तयार आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मी लवकरच ‘या’ पक्षाची स्थापना करणार; करुणा शर्मा लढवणार सर्व निवडणुका!
- मी बांधेल तेच तोरण अन् मी म्हणेल तेच धोरण; मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्यावर बाण
- अन् नितेश राणेंनी काढला ‘म्याव म्याव…’ आवाज, वाचा सविस्तर
- अधिवेशनादरम्यान मास्क न लावणाऱ्यांना अजित पवारांनी चांगलंच खडसावलं
- राजाचा पोपट मेला पण राजाला सांगायचं कसं?; फडणवीसांचा मलिकांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
