मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवशेन सुरु आहे. या अधिवेशनाची सुरुवात अतिशय तापलेल्या वातावरणाने झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थित होते. त्यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी देखील भाष्य केले आहे.
1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. हे पहिले असे चहापान आहे, ज्यावर मुख्यमंत्र्यांनीच बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिले आणि तेच स्वतः आले नाहीत. विरोधक चहापानावर बहिष्कार टाकतात, हे नेहमीच बघण्यात येते. पण मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याची ही राज्य स्थापन झाल्यापासून पहिली घटना आहे. ‘मी बांधेल तेच तोरण आणि मी म्हणेल ते धोरण’, अशा मनमानी पद्धतीने मुख्यमंत्री कारभार चालवत आहे, असा घणाघाती आरोप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवरच विश्वास राहिलेला नाही. हे चुकीचे आहे. त्यांनी कुणालाही प्रभार द्यावा. पण मुख्यमंत्रिपदाचा असा अपमान करणे योग्य नाही. अगदी राजा महाराजांच्या काळातही राजा काम करण्यास कुठल्याही कारणात्सव सक्षम नसेल, तर राजगादीचा प्रभार कुणालातरी सोपविला जात असे. पण आपल्या मुख्यमंत्र्यांना हे का सुचत नाही. त्यांना महाराष्ट्राची काळजीच नाही, असं एकंदरीत दिसत आहे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
विदर्भ मराठवाड्यातील जनता महाराष्ट्रात राहते, ही बाब सरकार सोयीस्करपणे विसरत आहे. वैधानिक विकास मंडळाची आकडेवारी सांगते आहे की नागपूर, विदर्भ व मराठवाड्यावर लोकसंख्येच्या अनुपातात खर्च झालेला नाही. त्यामुळे विधिमंडळाचे सुरू असलेले हे हिवाळी अधिवेशन विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय करणारे आहे, असा आरोप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अन् नितेश राणेंनी काढला ‘म्याव म्याव…’ आवाज, वाचा सविस्तर
- अधिवेशनादरम्यान मास्क न लावणाऱ्यांना अजित पवारांनी चांगलंच खडसावलं
- राजाचा पोपट मेला पण राजाला सांगायचं कसं?; फडणवीसांचा मलिकांना टोला
- त्यांना माझा बाप काढून काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांची आव्हाडांवर आगपाखड
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत


