अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता त्यांनी नविन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.
करुणा शर्मा यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) सभा घेऊन लवकरच त्या पक्षाची स्थापना करणार आहेत. ‘शिवशक्ती सेना’ (Shiv Shakti Sena) असे नवीन पक्षाचे नाव असल्याचे करुणा शर्मा यांनी जाहीर केले आहे.
अनेक पक्षांनी मला प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं होतं, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत, असा दावाही करुणा शर्मा यांनी केला आहे.
अहमदनगरमध्ये जानेवारी अखेरीस मोठा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्या संदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरात मला खूप वाईट अनुभव आला असून मी एकटी नाही, अशा अनेक महिला आहेत, ज्यांना त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मी बांधेल तेच तोरण अन् मी म्हणेल तेच धोरण; मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्यावर बाण
- अन् नितेश राणेंनी काढला ‘म्याव म्याव…’ आवाज, वाचा सविस्तर
- अधिवेशनादरम्यान मास्क न लावणाऱ्यांना अजित पवारांनी चांगलंच खडसावलं
- राजाचा पोपट मेला पण राजाला सांगायचं कसं?; फडणवीसांचा मलिकांना टोला
- त्यांना माझा बाप काढून काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांची आव्हाडांवर आगपाखड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

