Share

“…त्यांचा हेतू स्वछ नव्हता”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘परवा साहेबांच्या घरी हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वछ नव्हता त्यांनी साहेबांच्या घराची रेकी केली होती आणि त्यांना शरद पवारांना शारीरिक इजा करायची होती. महाराष्ट्राचे नशीब असे काही घडले नाही’, असे आव्हाड म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बर १०९ आंदोलकांना अटक केली असून त्यांची रवानगी काल (९ एप्रिल) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!