Share

IPL 2022 : RCBचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन; मुंबईविरुद्धची मॅच खेळताना समजली वाईट बातमी!

Published On: 

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२मध्ये काल रात्री मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध दणदणीत विजय नोंदवूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षल पटेल बायो-बबल सोडून आपल्या घरी परतला आहे. हर्षलच्या बहिणीचे निधन झाले आहे आणि त्यामुळेच त्याने मुंबईविरुद्धचा सामना खेळल्यानंतर लगेचच घर गाठले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या बहिणीच्या मृत्यूची बातमी आली होती आणि या कारणास्तव टीमने सामना संपेपर्यंत पुण्याहून त्याची घरी जाण्याची व्यवस्था केली होती. सामना संपताच तो आपल्या घरी रवाना झाला आणि एक दिवसानंतर तो पुन्हा संघात सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हर्षलला पुन्हा संघात येण्यापूर्वी क्वारंटाइन करावे लागेल की नाही हे सध्या स्पष्ट झालेले नाही. ही स्पर्धा जैव-सुरक्षित वातावरणात खेळवली जात आहे. हर्षलला अनिवार्य तीन दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये पाठवल्यास तो १२ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडेल.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!