Share

“राज्यातले भाजपचे नेते कायद्याची ऐशी तैशी करायला निघालेत”; नाना पटोलेंचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. म्हणाले, “महाराष्ट्रात पहाटेचं सरकार गेल्यामुळे भाजपाचा थयथयाट झाला आहे. दीड दिवसांचे गणपती असतात तसेच ते विसर्जित झाले. राज्यातील नेत्यांना त्रास देण्याचे प्रकार भाजपने सुरु केले आहे. राज्यातले भाजपचे नेते कायद्याची ऐशी तैशी, विचारांची ऐशी तैशी करायला निघालेत, असा पटोलेंनी कोल्हापूरमध्ये बोलत असताना भाजपवर घणाघात केला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये प्रतिष्ठेची लढाई होत असताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

तसेच पुढे म्हणाले, “भाजपच्या कालच्या सभेतून त्यांचा हिंदूंचा अजेंडा सेट केला. निवडणुका आल्या की यांना हिंदुत्व आठवतं. मूठभर लोकांसाठीच केंद्रातील सरकार काम करते. यांच्या सभांसाठी बाहेरची लोकं आणावी लागली. पण कोल्हापूरमधील जनताच यांना धडा शिकवेल. काँग्रेसने कधीही धर्माचा वापर केला नाही. भाजप अतिशय खालच्या स्तरावर जाऊन धर्माचा वापर करत आहे”. अशी भाजपवर सडेतोड टीकाही केली.

महत्वाच्या बातम्या –

अखेर वसंत मोरेंच्या मेसेजला रिप्लाय; राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बोलावले!
शरद पवार यांचे नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत!
शिवसेना भवनासमोरच भोंगा लावून हनुमान चालीसा पठण; मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
“तेढ निर्माण करणाऱ्यांना बळी पडू नका” – अजित पवार  
अनिल बोंडे यांच्या विरोधात हडपसर पोलिसांत तक्रार दाखल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!