Share

मनसेला मोठा झटका! राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर दिला राजीनामा

Published On: 

धुळे : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. तसेच या वक्तव्याप्रकरणी नाराज झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसेचे धुळे उपमहानगर प्रमुख साहिल खान (Sahil Khan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मागील सात वर्षापासून मनसेचे प्रामाणिकपणे काम करणारे धुळ्यातील साहिल शेख हे मनसेच्या उप महानगरप्रमुख पदी काम करीत होते, त्यांनी नुकतीच जनसेवेसाठी ॲम्बुलन्स देखील घेतली होती, त्या ॲम्बुलन्स वर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते स्थापन विभाग नाव आणि राज ठाकरे यांचा फोटो लावला होता, मात्र त्यांनी आज पक्षावर आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज होऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी ॲम्बुलन्स वरील राज ठाकरेंचे पोस्टर काढून नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, पण तिथे भोंगे बसवल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगण्यात आले आहे.’ तसेच यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असे राज ठाकरे २ एप्रिल रोजी पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!