Share

“…तो मुद्दाम चित्रित केलाय”, कीर्तनकारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : औरंगाबाद जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील ४८ वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील ४० वर्षीय महिला यांचा एक अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासांदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना तृप्ती देसाई म्हणाल्या की,‘मी गृहमंत्र्यांकडे यासंदर्भात मेलद्वारे तक्रार दाखल करणार आहे. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. पण हा व्हिडीओ आता सार्वजनिक झालाय आणि त्या महिलेनेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.’ तसेच जर यासंदर्भात आवाज उठवला गेला नाही तर उद्या अनेक महिला कीर्तनकारांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून जाईल. त्यामुळे याविषयी आम्ही पुढाकार घेत आहोत.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,‘माझ्यामते हा व्हिडीओ जाणीवपूर्वक चित्रित करण्यात आला आहे.’ तसेच कीर्तनकारांना लोकं देवासमान मानतात, त्यांचे लोकं दर्शन घेत असतात पण अशा प्रकारच्या कृत्यांमुळे वारकरी संप्रदायाचेही नाव खराब होते. त्यामुले अशा कीर्तनकारांची पदवी काढून घेऊन त्यांच्या कीर्तनावर बंदी आणायला हवी, असेही तृप्ती देसाई यावेळी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!