🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आरोग्य खात्याच्या एका विषयावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर मिश्किल टोलेबाजी केली. किटक संहाराकाच्या मार्फत कार्यक्षेत्रातील डास पकडून त्याचे वर्गीकरण करणे, डास घनता काढणे, डासांचे विच्छेदन करणे असा विषय आरोग्य खात्याने ठेवला होता. यावर किती डास पकडले, किती नर आणि मादी होते असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
आधी भुजबळांनी हा विषय वाचून दाखवला. त्यानंतर हे काम अतिशय चांगलं असल्याचा टोमणा मारला. या सर्व डासांचं विच्छेदन केल्यावर त्यात किती नर आणि मादी डास आढळून आले. त्या विच्छेदनातून अतिशय संहारक डास कोणता आहे? मादी डास आहे की नर डास आहे? त्या विषयाचा आपल्याकडे रिपोर्ट आला का, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Sambhaji Chhatrapati | “तुम्ही आश्वासनाचे कागद घेऊन आला होता?” ; संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्याना करुन दिली जुन्या आश्वासनाची आठवण
- Sanjay Raut | संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम 5 सप्टेंबरपर्यंत वाढला
- Rohit Pawar| “ओवर्सीज बँकेत 52 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार…”, रोहित पवार यांचा मोहित कंबोज यांच्यावर हल्लाबोल
- Shivsena vs BJP | 2024 चा बुलडाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच? संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया
- Mohit Kamboj| रोहित पवार येणार का अडचणीत?, मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे एकच चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
