🕒 1 min read
बीड : बीडमध्ये आयोजित शिवसंपर्क अभियानासाठी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर हे उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत बोलताना क्षीरसागर यांनी त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ता हे आपलं अंतिम साध्य नसून परिवर्तनाचं साधन आहे, असे ते या वेळी म्हणाले.
“हे ऐरे ऐरे गैरे नथ्थू खैरे, यांना वाटतं की बीडचा सातबाराच आता आपला झाला आहे. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून टोल कसा वसूल करता येईल? फक्त हेच पाहिलं जातं”, अशी जळजळीत टीका त्यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
