मुंबई: आयपीएलचा १५वा सीझन सुरू होण्यासाठी फक्त १ दिवस उरला आहे. सर्व संघ आपापल्या रणनीतीसह मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान, असे काही संघ आहेत ज्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींना सामोरे जावे लागले होते. यापैकी एक संघ म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स हा नवा आयपीएल संघ. काही दिवसांपूर्वी मार्क वुड दुखापतीमुळे आयपीएलमध्ये भाग घेऊ शकणार नसल्याची बातमी आली होती. यानंतर आता संघाला वुडचे रिप्लेसमेंट मिळाले आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वुडला ७.५० कोटींची मोठी रक्कम देऊन आपल्या संघात समाविष्ट केले. काही दिवसांपूर्वी मार्क वुडने (mark wood) दुखापतीमुळे IPL 2022 मधून माघार घेतल्याचे वृत्त आले होते. आता लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वुडच्या जागी ऑस्ट्रेलियन मध्यमगती गोलंदाज अँड्र्यू टायचा समावेश केला आहे. ट्विटर हँडलवरून लखनऊमध्ये टाय (andrew tye) सामील होण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
Ab apni baari hai, kyuki humari team mein Andrew Tye bhaari hai! #AbApniBaariHai ????@aj191
????: Cricket Australia#LucknowSuperGiants #TataIPL #IPL2022 #UttarPradesh #Lucknow #LSG2022 #CricketUpdates #CricketNews pic.twitter.com/KNiL0oyO3m— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 23, 2022
अँड्र्यू टायने २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध आयपीएल पदार्पण केले आणि पर्पल कॅप जिंकली. टायला आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे आणि तो वेगवेगळ्या संघांसोबत खेळला आहे. गुजरात लायन्स या जुन्या संघाशिवाय त्याने पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचेही प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २७ आयपीएल सामन्यांमध्ये ४० विकेट्स घेतल्या आहेत. टायने २०१७ मध्ये गुजरातकडून पदार्पण केले आणि पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हॅटट्रिकसह ५ विकेट घेतल्या. तो ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता.
महत्वाच्या बातम्या
- आमिरच्या ‘लाल सिंग चढ्ढा’वर बहिष्कार घालण्याची मागणी, जाणून घ्या काय आहे कारण
- “काय मुख्यमंत्री मिळालाय महाराष्ट्राला असंख्य महत्त्वाचे प्रश्न सोडून…”, निलेश राणेंचा टोला
- “आता मुंबईकरांकडून पण ‘वसूली’ करणार का?”, आशिष शेलारांचा सवाल
- PAK vs AUS: शाहीन वॉर्नरच्या नेत्रपल्लवीवर नेटकऱ्यांनी बनवले मिम्स; एक जण म्हणाला ‘हे तर जया अमिताभ’
- महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वीर सावरकर’ यांच्या बायोपिकमध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत


