🕒 1 min read
मुंबई : आमिर खान गेल्या काही दिवसांत चर्चेत आला होता. परंतु आता आमिरचा लाल सिंग चढ्ढा हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अजुन तो प्रदर्शितही झाला नाही तोच त्याच्याभोवती वाद निर्माण होतो आहे. सध्या द काश्मीर फाईल्स हा चित्रपट वादाचे कारण ठरतो आहे. त्यात दाखवण्यात आलेल्या विषयामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्यावेळी तो आरआरआरच्या प्रमोशनला गेला होता. त्याठिकाणी देखील त्या चित्रपटावरुन आमिरला काश्मीर फाईल्सच्या प्रश्नावरुन छेडण्यात आले होते. तेव्हा त्यानं आपण अजुनही हा चित्रपट पाहिलेला नाही. मी तो लवकरच पहिन. मात्र सध्या त्याच्यावर जो काही कौतूकाचा वर्षाव होतो आहे त्याबद्दल मी निर्माते आणि दिग्दर्शक यांचे अभिनंदन करेल. काश्मीरी पंडितांच्याबाबत जे काही झाले ते चुकीचे आहे. अशी प्रतिक्रिया आमिरनं दिली होती. आता ट्रोलर्सनं आमिरला त्याच्या लाल सिंग चढ्ढावरुन ट्रोल केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन हा चित्रपट बॉयक़ॉट करण्याची मागणी केली आहे.
आमिरनं प्रेक्षकांना काश्मीर फाईल्स पाहायला पाहिजे. अशा प्रकारचं विधान केलं होतं. त्यावेळी त्याला काही नेटकऱ्यांनी त्याच्या पीके चित्रपटाची आठवण करुन दिली होती. त्यात त्यानं हिंदू धर्माला चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आले होते. यावेळी नेटकऱ्यांनी करिनावर देखील टीका केली होती. त्यात तिनं नेपोटीझवर भाष्य केले होते. लोकचं स्टारच्या मागे धावतात. नका जाऊ चित्रपट पाहायला. त्यामुळे चाहतेही नाराज झाले होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या वादाचा फटका आमीरच्या लाल सिंग चढ्ढाला बसला आहे.त्यामुळेच त्याच्यावर टीका होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
