मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना जयंत पाटील म्हणाले की,‘सदरचा प्रकार हा निंदनीय असून हल्ला करणारे नेमके कोण होते, हे आंदोलक होते का? ज्यावेळी हे सर्वजण शरद पवार यांच्या घराजवळ गेले होते त्यावेळी त्यांची अवस्था बघून ते आंदोलक असल्याचं वाटले नाही.’ तसेच या सर्व प्रकरणामागे मोठे षडयंत्र असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बर १०९ आंदोलकांना अटक केली असून त्यांची रवानगी काल (९ एप्रिल) झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- मनसेला मोठा झटका! राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर दिला राजीनामा
- पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- …हा विषय राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी अर्धवट सोडता कामा नये- संजय राऊत
- “यंत्रणांचे राजकीय ‘बॉस’ जे टार्गेट देतील त्यानुसार कारवाया सुरु”, राऊतांचा गंभीर आरोप
- शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद


