मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर ६ एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘शरद पवार हे संसद भवनात पंतप्रधान मोदी यांना भेटले. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय हेतूने चुकीच्या दिशेने कारवाया करीत आहे. राजकीय विरोधकांशी सामना करण्याची ही रीत नाही, असे पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले. माझ्यावर व्यक्तिशः ईडीने कारवाई केली, त्यास कोणताही आधार नाही. पण Selected targets या पद्धतीने महाराष्ट्रात, बंगालात कारवाया सुरू आहेत. अशा कारवायांत नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा थेट हस्तक्षेप असेल असे दिसत नाही. पण महाराष्ट्रातील भाजपचे एक प्रमुख नेते व केंद्रीय तपास यंत्रणांचे एक-दोन बडे अधिकारी मिळून महाराष्ट्रातला खेळ खेळत आहेत.’
दरम्यान, ‘राजकीय विरोधकांवर कशी व कधी कारवाई करायची, त्याआधी बदनामीची मोहीम राबवायची. भाजपशी संबंधित एक-दोन लोकांनी अशा कारवाईसंदर्भात सोशल मीडियावर सूतोवाच करून धमकवायचे हा प्रकार मोदी यांची प्रतिष्ठा पंतप्रधान म्हणून धुळीस मिळवणारा आहे’, असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आजचे सत्ताधारी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “मुख्यमंत्री हे प्रकरण…”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर राज्यपालांची प्रतिक्रिया
- Maharashtra Kesari 2022 : कोल्हापूरचा १९ वर्षीय पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी..! तब्बल २१ वर्षानंतर घडली ‘अशी’ गोष्ट
- “हल्ला करायचाच होता तर ‘मातोश्री’वर…”, दिलीप मोहितेंचे मोठे वक्तव्य
- “बळकावलेल्या जमिनी बाहेर काढल्या म्हणून सदावर्तेंना अटक’; जयश्री पाटील यांचा आरोप


