Share

शरद पवार आज विदर्भ दौऱ्यावर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

Published On: 

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज (१० एप्रिल) विदर्भ दौऱ्यावर असून दोन मोठे कार्यक्रम तसेच दोन बैठकांसाठी ते आज दुपारी अमरावतीत येत आहेत. तसेच यावेळी ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विभागीय संपर्क प्रमुख संजय खोडके (Sanjay Khodake) म्हणाले की,‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवी बळकटी देण्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची स्थिती जाणून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संवाद बैठक आज सायंकाळी ५ वाजता अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.’

दरम्यान, या बैठकीला शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील मंत्रीगण, आमदार, माजी आमदार, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरीक्षक सर्व जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या सर्व फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद करून पक्ष बळकटीला घेऊन शरद पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे, असेही खोडके म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!