🕒 1 min read
मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांचा १ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यावरून राजकीय वर्तुळात संशयाच्या अनेक चर्चा रंगत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘कार्डिलिया’ क्रूझवर जे ड्रग्ज प्रकरण झाले त्यात शाहरुख खानच्या मुलास सरळ अडकवण्यात आले. ज्या प्रभाकर साईल या पंचामुळे एनसीबी अधिकाऱ्याचा खोटेपणा समोर आला तो प्रभाकर साईल आता संशयास्पदरीत्या मरण पावला. या प्रकरणातील संबंधित अधिकारी भाजपच्या एका तरुण पुढाऱ्याचा सर्व प्रकारचा अनैतिक पाहुणचार घेतात व त्यातूनच प्रभाकर साईलचे बरेवाईट झाले काय, हा तपासाचा विषय आहे. प्रभाकर साईलच्या मृत्यूचा विषय राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी अर्धवट सोडता कामा नये. ते रहस्यमय, तितकेच धक्कादायक ठरू शकेल.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘न्यायालयापासून केंद्रीय तपास यंत्रणांपर्यंत सगळेच जण माणसे आहेत व त्यांचे पाय मातीचे आहेत. हिंदुस्थानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रामण हे देशाच्या संविधानाचे मुख्य रक्षक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी व्यक्त केलेली भीती व चिंता महत्त्वाची. ”सीबीआय, ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी पूर्णपणे विश्वासार्हता गमावली आहे. केंद्रीय यंत्रणा निःपक्ष राहिल्या नसून सर्व यंत्रणांचे एकत्रीकरण करून त्यावर नियंत्रण ठेवणारी एक व्यवस्था निर्माण करावी”, असे मत देशाचे प्रमुख न्यायाधीश व्यक्त करतात तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांवरचा विश्वास डळमळीत होतो.’
महत्त्वाच्या बातम्या –
- “केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आजचे सत्ताधारी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- Maharashtra Kesari 2022 : कोल्हापूरचा १९ वर्षीय पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी..! तब्बल २१ वर्षानंतर घडली ‘अशी’ गोष्ट
- “हल्ला करायचाच होता तर ‘मातोश्री’वर…”, दिलीप मोहितेंचे मोठे वक्तव्य
- “बळकावलेल्या जमिनी बाहेर काढल्या म्हणून सदावर्तेंना अटक’; जयश्री पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
