Share

“केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आजचे सत्ताधारी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ६ एप्रिल रोजी राज्यसभेत बोलत असतांना गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आम्हाला सक्षम आणि मजबूत विरोधी पक्ष हवा आहे, पण आमच्या हातात काय आहे? हे जनतेने ठरवायला हवे, असे वक्तव्य केले. दरम्यान, अमित शहांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून भाष्य केले आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘अमित शहा यांचे बोलणे तर्कसंगत आहे. पण केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून आजचे सत्ताधारी आधीच दुर्बल असलेल्या विरोधी पक्षाचे हात-पाय छाटणार असतील तर काय करायचे, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. लोकसभेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. राज्यसभेत आधी ते नव्हते, पण आता राज्यसभेतही भाजप व त्यांचे मित्रपक्ष शंभर आकडा पार करून पुढे गेले. राज्यसभेत काँग्रेसची अवस्था रोडावलेल्या मांजरीसारखी झाली आहे. त्याकडे बघून शहा यांनी हे विधान केले असावे. ते खरे असले तरी विरोधी पक्षाला लगाम राहावा यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा हंटर केंद्राने आपल्या हाती कसा ठेवला आहे त्याची प्रकरणे रोजच समोर येत आहेत.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘हा मजकूर लिहीत असताना ‘ईडी’च्या ताब्यातील अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले व पोलीस बदल्यांच्या संदर्भात चौकशी सुरू केली. पोलीस बदल्यांत भ्रष्टाचार झाला म्हणजे नक्की काय झाले व त्याचे पुरावे काय? या बदल्यांत शंभर कोटींचा व्यवहार झाला. तो पुढे पाच कोटी व आता देशमुखांवरील आरोपपत्रात तो आकडा दोन कोटींच्या खाली घसरला व त्यासाठी देशमुख व त्यांच्या कुटुंबावर १२० च्या आसपास धाडी केंद्रीय तपास यंत्रणांनी घातल्या. देशात व राज्यात पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेश व पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी बदल्यांचा धडाकाच लावला. म्हणून तेथे बदल्यांत घोटाळा झाला काय? एखादा परमबीर सिंग तेथे उपटला व त्याने अशी तक्रार केली तर सीबीआय तेथेही तपास करू शकेल काय?’, असा खोचक सवालही राऊतांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!