Share

जयंत पाटलांनी सांगितलं राष्ट्रवादीला जिव्हारी लागणाऱ्या पंढरपूरच्या पराभवाचं कारण, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. ३७१६ मतांच्या आघाडीने समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे.

या विजयानंतर भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिव्हारी लागणाऱ्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केरळ येथे तीन तर महाराष्ट्र येथे एका जागेवर निवडणूक लढवली होती. केरळात दोन ठिकाणी आम्ही यशस्वी ठरलो तर महाराष्ट्रातील मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली, मात्र दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्यांतील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. या निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो,’ अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!