Share

अर्थचक्र थांबले तरी उद्योजक व्यापाऱ्यांनी ‘जान है तो जहान है’ हे समजुन घेण्याची गरज – केंद्रिय मंत्री पियुष गोयल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यासह देशातील अर्थचक्र थांबले असले तरी उद्योजक व्यापा-यांनी शासन नियमांचे पालन करणे गरजेचे असून ‘जान है तो जहान है’ हे तत्व अवलंबण्याची गरज आहे. आज आर्थिक झळ सोसली तरच भविष्यात पुन्हा उद्योग-धंदे सुरू करणे शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. कोरानाच्या पाश्र्वभूमीवर व्यापार-उद्योग क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या अडचणी, सरकारकडून या क्षेत्राच्या असलेल्या अपेक्षा व सरकारचे पुढील धोरण याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन पद्धतीने साधण्यात आलेल्या संवादाप्रसंगी ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल बोलत होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीतर्फे या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, शुभांगी तिरोडकर, अनिल लोढा, जालना स्टील असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम गोयल, कॅमलिन उद्योग समूहाचे प्रमुख श्रीराम दांडेकर यांच्यासह आदी मान्यवर चर्चेमध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

व्यापार, उद्योग व सेवा क्षेत्र विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जात असताना कोरोना महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. सरकार या क्षेत्रांच्या ऊर्जितावस्थासाठी विशेष धोरण आखत आहे. व्यापार, उद्योग क्षेत्र तसेच सेवा क्षेत्रातील घटक कायदेशीर तरतुदींचे पालन करताना मेटाकुटीस येत आहेत. अशा संकटसमयी या क्षेत्राच्या मदतीसाठी सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे, या विषयांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

दरम्यान, पुढे बोलतांना केंद्रिय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योजकांनी या महामारीच्या संकटात या आधिही शासनाला सर्वोतोपरी मदत करत सामंजस्याची भुमिका ठेवली आहे. त्यामुळे यापुढेही असेच सहकार्य करत आत्ता केवळ या संकटातुन बाहेर कसे पडता येईल याचा विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. या महामारीमुळे छोट्या व्यापा-यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यातुन बाहेर पडायला एक मोठा कालावधि जावा लागणार असल्याने, अत्त्यावश्यक सेवा व अनात्यावश्यक सेवा कोणत्या यावर वाद घालण्याची ही वेळ नसून उद्योजक व्यापा-यांनी कोरोना बाधितांना मदत करावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी व्यापा-यांना केले आहे. ऑक्सिजनसाठी सिलेंडरचर पुरवठा करण्याच्या सुचनाही केंद्रिय मंत्र्यांकडून करण्यात आल्या आहेत. या संवादसत्राचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी तर आभार प्रदर्शन अनिल लोढा यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!