🕒 1 min read
पंढरपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. ३७१६ मतांच्या आघाडीने समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे.
या विजयानंतर भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. तर, विजयानंतर माध्यमांशी बोलताना माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. ‘ये तो सिर्फ बाकी है, पुरा महाराष्ट्र बाकी है ! अजितदादा तुम्ही आता दिवस मोजायला लागा. फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात झालीये,’ असं सुचक भाष्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलं आहे.
यासोबतच, ‘अजित पवारांच्या तिजोरीची दारं फक्त बारामतीसाठी खुली होतात. उजनीचं पाणी पळवण्याचा डाव आम्ही मोडीत काढू. आधीपण मी सांगितलं होतं हे पाणी पळवणार. आता सत्ता आल्यानंतर त्यांनी तेच केलं. माढ्यानंतर आता पंढरपूर-मंगळवेढ्यात पण भाजपचा झेंडा फडकला आहे.’ असं देखील निंबाळकर म्हणाले आहेत.
‘आता मविआतील आमदारांनी धोका समजून एक पाऊल पुढे टाकावं’
‘पंढरपुर पोट निवडणुकीमधे मविआ मंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्री पर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले.. तरीही लोकांनी नाकारले.. मविआ मधल्या आमदारांना हा संदेश आहे.. येणारा धोका समजा आणि.. एक पाउल पुढे टाका.. भा ज प हा एकच पर्याय आहे.. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे!!’ असं भाष्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवण्याचे सायमन डौल यांनी सांगितले कारण…
- बंगालचे निकाल समोर येताच अमित शाहांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- ‘जखमी वाघिणीचा ऐतिहासिक विजय!’, संजय राऊतांची बंगाल निकालावर प्रतिक्रिया
- ‘लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली’, बंगाल निकालावर गुलाबराव पाटलांची टीका
- समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

