🕒 1 min read
पंढरपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. ३७१६ मतांच्या आघाडीने समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे.
भारतनानांच्या निधनामुळे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यामागे सहानुभूती असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी समाधान आवताडे यांना पंढरपुरात परिचारक गटाचं मोठं समर्थन मिळाल्यामुळे भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासारख्या दिग्गजांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी जोर लावला होता.
मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भाजपने पराभूत केल्यामुळे भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण आता कोरोनाशी लढायचं आहे. ही वेळ नाही. आता आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी वळविले आहे.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
‘भाजपवर जनतेनं विश्वास दाखवला. त्यामुळे मी पंढरपूरच्या जनतेचं मनापासून आभार मानतो. गेल्या दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैरप्रकाराला, भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला एकप्रकारे आरसा दाखवण्याचं काम पंढरपुरच्या जनतेना केलाय. हे सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत राज्य सरकारचे तीन पक्ष उतरले. साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या पद्धती अवलंबले. त्यांनी प्रशासनाचा गैर उपयोग केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरउपयोग केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला.’ असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अर्थचक्र थांबले तरी उद्योजक व्यापाऱ्यांनी ‘जान है तो जहान है’ हे समजुन घेण्याची गरज – केंद्रिय मंत्री पियुष गोयल
- ३ मे पासून पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा तर ५ मे पासून ऑनलाईन पद्धतीने
- ‘अजितदादा तुम्ही दिवस मोजायला लागा; फडणवीसाहेबांनी ठरवलेल्या करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात झालीये !’
- ‘अजित दादांचा राजीनामा मागायचा तर सरळ मागा,द्राविडी प्राणायम कशाला?’;मलिकांना टोला
- पंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट झाली – रावसाहेब दानवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

