🕒 1 min read
मुंबई : देशात कोरोना संकट वाढत असतानाच केरळ, पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणूक पार पडल्या होत्या. यानंतर, आज मतमोजणी पार पडत असून निकाल जाहीर होत आहेत. केरळ विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ उमेदवारांचा विजय झाला आहे.
केरळातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि वाहतूक मंत्री ए के शशीधरन पुन्हा एकदा इलाथूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. शशीधरन यांना ५७ हजार ५९८ मतं पडली असून २५ हजार ६८४ मतांनी त्यांनी अपक्ष उमेदवाराचा पराभव केला आहे. तर, भाजपला तिसऱ्या जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर कुट्टानाद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार थॉमस के थॉमस यांना 47082 मतं मिळाली असून त्यांनी केरळ काँग्रेसच्या उमेदवाराचा ४ हजार २७९ मतांनी प्रभाव केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केरळ येथे तीन तर महाराष्ट्र येथे एका जागेवर निवडणूक लढवली होती. केरळात दोन ठिकाणी आम्ही यशस्वी ठरलो तर महाराष्ट्रातील मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो.’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवण्याचे सायमन डौल यांनी सांगितले कारण…
- बंगालचे निकाल समोर येताच अमित शाहांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- अर्थचक्र थांबले तरी उद्योजक व्यापाऱ्यांनी ‘जान है तो जहान है’ हे समजुन घेण्याची गरज – केंद्रिय मंत्री पियुष गोयल
- ‘लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली’, बंगाल निकालावर गुलाबराव पाटलांची टीका
- ‘अजितदादा तुम्ही दिवस मोजायला लागा; फडणवीसाहेबांनी ठरवलेल्या करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात झालीये !’


