🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कोरोनाची लागण झाली असून तो या मालिकेतूनही बाहेर झाला आहे. टी-२० विश्वचषकासाठी स्टँडबाय खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया शनिवारी मोहालीला पोहोचली तेव्हा ही माहिती बीसीसीआय आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली.
ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच मोहालीत आहे. पाहुण्या संघाने मोहालीत सरावही केला. शमी बाद झाल्यावर बदली म्हणून कोणत्या खेळाडूचा समावेश होतो हे पाहावे लागेल. भारतीय संघ 20 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळणार आहे. त्यानंतर पुढील सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे. तिसरा आणि अंतिम सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा भारत दौरा संपुष्टात येणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघही भारत दौऱ्यावर खेळणार आहे. शमी या संघाविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळू शकेल की नाही, हे पूर्णपणे त्याच्या रिकव्हरीवर अवलंबून आहे. 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. शमीला कोरोनाची लागण होणे दुर्दैवी आहे. T20 विश्वचषकासाठी तो स्टँडबाय खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीला खूप महत्त्व आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | “एकच मुलगी मग अग्नी कोण देणार?”, प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले…
- Cabinet expansion । दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?; ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
- Uddhav Thackeray | “…मग दाखवतो शिवसेना काय आहे ते”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्ला
- Shivsena। ठरलं! ‘या’ मैदानावर होणार आता शिंदे गटाचा दसरा मेळावा; दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज पालिकेने स्विकारला?
- Vinayak Raut | एकनाथ शिंदेंवर टीका करताना विनायक राऊतांची घसरली जीभ म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

