Share

County Cricket : OMG..! जेम्स अँडरसननं इंग्लंडच्या माजी कर्णधाराची केली दांडी गूल; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : काऊंटी क्रिकेट (County Cricket) मध्ये इंग्लंडचे दोन सध्याचे महान खेळाडू जेम्स अँडरसन आणि इंग्लंडचा माजी कप्तान जो रूट आमनेसामने आले. लीसेस्टरशायर विरुद्ध यॉर्कशायर सामन्यादरम्यान अँडरसनने रूटला त्याच्या अप्रतिम इन-स्विंग चेंडूने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रुटला अशा पद्धतीने बोल्ड केल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने एक ट्वीट केले. यात त्याने, “अरे माझा रिव्हर्स स्विंग”, असे म्हटले.

इंग्लंडचा कसोटी क्रिकेट संघ सध्या बदलातून जात आहे. अॅशेस आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या पराभवानंतर जो रूटने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बेन स्टोक्सची नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा माजी स्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलमकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अॅशेस मालिका गमावल्यानंतर इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दौरा केला. या दौऱ्यात जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. जो रूटच्या या निर्णयावर संघ व्यवस्थापनासह इंग्लिश मीडियामध्ये जोरदार टीका झाली. या मालिकेत इंग्लंडला ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. अँडरसन आणि ब्रॉड यांनी अजूनही इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न सोडलेला नाही, त्यामुळे ते काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध आगामी मालिका खेळायची असून या मालिकेसाठी दोन्ही गोलंदाज घाम गाळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!