मुंबई : आयपीएल आणि वाद यांच्यात खूप घट्ट नाते आहे. कधी खेळाडूंमध्ये वाद होतात तर कधी स्पर्धेत फिक्सिंगचा आरोप होतो. आता आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना २०१९ मधील कथित स्पॉट-फिक्सिंग प्रकरणासंदर्भात पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने सात संशयित बुकींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. शिवाय, याच वर्षीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा आहे. २०१९ मध्ये माजी आयपीएल कमिशनर ललित मोदी यांनी तो शेअर केला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे, की ऋषभ पंतला आधीच चोकार कधी जाणार, हे माहीत होते. कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू होता.
https://twitter.com/LalitKModi/status/1112546024944340993?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1112546024944340993%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fsport%2Fcbi-arrest-seven-bookies-for-ipl-spot-fixing-allegations-rishabh-pant-video-viral-mhsd-703463.html
नेपाळच्या संदीप लामिछाने गोलंदाजी करत होता आणि रॉबिन उथप्पा फलंदाज होता. गोलंदाजी करण्यापूर्वीच पंत म्हणतो, ”हा चेंडू चौकार असेल.” सामन्यातही उथप्पा चौकार ठोकतो.
व्हिडिओ शेअर करत ललित मोदींनी लिहिले, ”हा काय विनोद आहे.. विश्वास बसत नाही. उच्च पातळीवर मॅच फिक्सिंग. IPL, BCCI आणि ICC कधी जागे होणार? लज्जास्पद. अधिकार्यांना खरी तर पर्वा नाही.” या मोसमाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले होते. त्याने विजेतेपदाच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जचा एका धावेने पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

