Share

IPL 2022 DC vs PBKS : डेव्हिड वॉर्नरला शहाणपण भोवलं! मॅचमध्ये काय झालं? पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या १५व्या हंगामातील ६४वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १७ धावांनी पराभव करून प्लेऑफची आशा कायम ठेवली आहे. दुसऱ्या बाजूला पंजाबचे आव्हान मात्र जवळ जवळ संपुष्ठात आले आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या. लक्षाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला ९ बाद १४२ धावा करता आल्या.

पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि सरफराज खान यांनी डावाची सुरूवात केली. गेल्या पाच सामन्यात दिल्लीची सलामीची जोडी धावा बनवण्यात अपयशी ठरली होती. या सामन्यात देखील दिल्लीची सुरुवात खराब झाली. गेल्या सामन्यात दिल्लीच्या विजयात नाबाद फलंदाजी करणारा वॉर्नर या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला. डावाचा पहिलाच चेंडू ड्राइव्ह करण्याच्या प्रयत्नात तो बॅकवर्ड पॉइंटला बाद झाला.

 

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वॉर्नरचा डाव फसला
दिल्लीच्या डावात वॉर्नरने स्ट्राईक न घेता नॉन-स्ट्रायकरवर जाण्याचा निर्णय घेतला. सरफराज खानने क्रीझवर जाऊन स्टान्स घेतला होता. पंजाबने देखील त्यानुसार फिल्डिंग लावली होती. पण त्यानंतर अचानक वॉर्नर नॉन-स्ट्रायकरवरून सरफराजकडे गेला आणि स्वत: स्ट्राइक घेतला. यामुळे पंजाबला पुन्हा फिल्डिंग बदलावी लागली. वॉर्नरचा हा निर्णय त्यालाच भारी पडला, तो पहिल्या चेंडूवर बाद झाला. आयपीएलमध्ये वॉर्नर आठ वर्षानंतर पहिल्यांदाच गोल्डन डक बाद झाला.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!