नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. बीसीसीआय आणि कोहली यांच्यातील मतभेदाचेही संकेत मिळाले. सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या वक्तव्यातही विरोधाभास दिसून आला. अशा परिस्थितीत शब्दांची निवड योग्य असायला हवी, अशी प्रतिक्रिया कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दिली आहे.
एका वृत्त संस्थेशी बोलताना राजकुमार शर्मा म्हणाले की, मला या विषयावर जास्त बोलायचे नाही कारण ते थेट विराटशी संबंधित आहे. पण असे कठोर शब्द दोन्ही बाजूंनी वापरले नसते तर बरे झाले असते असे मला वाटते. संघ चांगली कामगिरी करत आहे, मला वाटत नाही की आम्हाला अनावश्यक वादाची गरज आहे.
राजकुमार शर्मा पुढे म्हणाले की, विराट कोणत्याही गोष्टीचा लोभी नाही, त्याच्याकडे खूप आत्मविश्वास आहे आणि त्याला माहित आहे की तो त्याचे 100 टक्के देईल. जेव्हा अशा प्रकारचा संघर्ष किंवा वाद होतात, तेव्हा साहजिकच कोणत्याही खेळाडूला तो त्रासदायक ठरतो. पण मला आशा आहे की बोर्ड या परिस्थितीला सक्षमपणे सामोरे जाईल आणि ते पुढे ओढले जाणार नाही.
विशेष म्हणजे रोहित शर्माला वनडे कर्णधार बनवल्यानंतरच हे प्रकरण समोर आले आहे. रोहित शर्माला कर्णधार बनवल्यानंतर सौरव गांगुलीने विधान केले होते की, बोर्डाने कोहलीला टी-२० कर्णधारपदी कायम राहण्यास सांगितले होते. त्याला ते मान्य नव्हते, त्यामुळे एकदिवसीय आणि टी २० फॉरमॅटमध्ये दोन कर्णधार ठेवणे निवड समितीला योग्य वाटले नाही. यानंतर विराट कोहलीने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, कर्णधारपद सोडताना मला काहीही सांगितले गेले नाही. इथून प्रकरण उचकटले आणि ते अजूनही सुरू आहे. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र ‘हे’ कदापि सहन करणार नाही; काँग्रेसचा इशारा
- इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते?
- अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासन कटिबद्ध- नवाब मलिक’
- ‘एकटा कर्मदरिद्री खासदार विनायक राऊत सोडला तर…’, निलेश राणेंचा हल्लाबोल
- ‘मोदी काशीत महाराजांच्या शौर्याचा जयजयकार करतात तर भाजपशासित कर्नाटकात मात्र..’ राऊतांचे टीकास्त्र


