Share

Bharat Gogavale : संजय राऊतांमुळे आमच्यावर बंडखोरीची वेळ आली; भरत गोगवलेंच मोठं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी काढलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या १४ आमदारांच्या निलंबनाची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. यानुसार या १४ आमदारांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली. यानंतर आज गोगावले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भरत गोगावले म्हणाले कि, संजय राऊत काय बोलतात त्याचे परिणाम काय होतात हे सर्वांना माहीत आहे. संजय राठोडांनी सांगितलं त्यात काही चूक नाही. राऊतांमुळे बंडखोरीची वेळ आली आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना बराचसा अवधी दिला होता. आम्ही वाट पाहत होतो. पण हे आमच्या लोकांची पदे काढून घेत होते. राऊतांची विधाने काळजाला घरं पाडणारी होती. काळजाला चरे पडत होते. नार्वेकरांना चर्चेला पाठवत होते आणि दुसरीकडे पदे काढून घेतली जात होती. तर राऊत तोंडाला येईल ते बोलत होते. त्यामुळे आम्हाला मजबुरीने हालचाली सुरू कराव्या लागल्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, माजी मंत्री शंभूराजे देसाई यांनी देखील राऊतांवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनी पक्षांमध्ये वेळोवेळी केलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावची वागणूक याचं घटनेला विरोध करत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा राजकारण सोडुन घरी बसेन. त्यामुळे आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देणार नाही, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!