🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. ‘नटरंग’ चित्रपटातून आणि त्या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्याने सोनाली प्रचंड हिट झाली होती. ‘अप्सरा आली’ या गाण्यातून सोनालीने चाहत्यांना मोहिनी घातली. त्याचं बरोबर उत्तम अशा डान्स आणि सौंदर्यानं सोनालीने चाहत्यांना खिळवून ठेवलं.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला बराच प्रतिसाद देतात. सोनाली सोशल मीडियावर फोटो शेअर करताच तिचे चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणि कंमेंट्सच वर्षाव होता.
https://www.instagram.com/reel/CP0ykpTFROF/?utm_source=ig_embed&ig_rid=a3272d02-7ee4-44e9-bc93-62d3dbd0f1c8
नुकताच सोनालीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोनाली आणि तिचा नवरा दोघेही एकत्र घरी वर्कआऊट करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. या फोटोवर एका युजरने कमेंट करत विचारले की, मराठी एखादा भेटला नाय काय लग्न करायला.

यावर सोनालीनेही युजरच्या प्रश्नाचे वेळीच उत्तर देत इतरांचीही देखील बोलती बंद केली. यावर सोनालीने म्हटले की, कुणाल मराठी असल्याचे तिने सांगितले. सोनालीला ट्रोल करायला गेलेला युजरने सोशल मीडियावर स्वतःचे हसू करून घेतले आहे.
सोनाली नुकतीच लग्नबंधनात अडकली तिने तिच्या जन्मदिनाच्या दिवशी अचानक लग्ग्न करून आपल्या चाहत्यांना सुखदः धक्का दिला. सोनाली लग्न अतिशय साध्या पद्धतीने केले. सोनालीने तिचे लग्न चार माणसांमध्ये पार पाडले. तिच्या लग्नाच्या दिवशीही साध्या मेकअपमध्ये देखील सोनाली छान दिसत होती.
महत्वाच्या बातम्या
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
- ‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती
- कोरोना प्रादुर्भावामुळे वॉर्नर आणि स्टॉयनीसची ‘या’ लीग मधुन माघार
- यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, इमाम-उल-हकने सांगितले ‘हे’ कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
